Loading...

सोम-शनि: सकाळी 09.30 am ते संध्या 06.00 pm

विश्‍वास अर्बन

पिग्मी / दैनंदिन ठेव योजना

मित्रांनो, आपल्याला कुठलंही आर्थिक उद्दिष्ट गाठायचं असेल तर त्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे बचत. आणि ही बचत आपण करू शकता विश्‍वास अर्बनच्या पिग्मी डेली सेव्हिंग्सच्या माध्यमातून. यावर तुम्हाला 6% पर्यंत व्याजदर मिळतो. छोट्या बचतीतूनही मोठा परतावा नक्की मिळू शकतो. खोटं वाटत असेल तर आमच्या पिग्मी/दैनंदिन ठेव योजनेचा लाभ घ्या, बचतीला सुरवात करा आणि मोठा परतावा मिळवा. सोबतच पिग्मी खात्यावर तुम्हाला व्यावसायिक कर्ज व इतरही अनेक सुविधा मिळतात. अधिक माहितीसाठी जवळील विश्‍वास अर्बनच्या शाखेला भेट द्या.

deposite-img
deposite-img

विश्‍वास अर्बन

मासिक ठेव योजना

स्वप्नं पूर्ण करायचं म्हंटलं की त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी गरज असते आर्थिक नियोजनाची. त्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने थोडे थोडे पैसे वाचवून आणि गुंतवून योग्य तो परतावा मिळाला की आपली स्वप्ने सहजपणे साकार करता येतात. शेवटच्या क्षणाला कोणाची मदत घेण्याची गरज पडत नाही आणि आर्थिक प्लॅनिंग सोयीस्कर होते. हा सर्व विचार करून विश्‍वास अर्बनने आणली आहे मासिक ठेव योजना. प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम यामध्ये गुंतवून मिळवा अधिकाधिक 6.5% परतावा. अधिक माहितीसाठी जवळील विश्‍वास अर्बनच्या शाखेला भेट द्या.

विश्‍वास अर्बन

विश्‍वास मुदत ठेव योजना

पैश्याला अनेक वाटा असतात. सर्वसामान्य कुटुंबात पैसे आले की कसे खर्च होतात हे लक्षातही येत नाही. खर्च इतके असतात की इन्व्हेस्टमेंट करायचं मागेच राहते. आणि यामध्ये छोटी मोठी बघितलेली स्वप्नं तशीच मागे पडतात. या सर्वांचा विचार करून विश्‍वास अर्बन आपल्यासाठी घेऊन आले आहे विश्‍वास मुदत ठेव योजना. अधिक माहितीसाठी जवळील विश्‍वास अर्बनच्या शाखेला भेट द्या.

deposite-img
दिवस/महिने व्याजदर (%) ज्येष्ठ नागरिक
४६ दिवसांपासून ९० दिवसांपर्यंत ६.५०
९१ दिवसांपासून १८० दिवसांपर्यंत ७.५०
१८१ दिवसांपासून २७० दिवसांपर्यंत ८.५०
२७१ दिवसांपासून ३६४ दिवसांपर्यंत ९.५०
१२ महिने पूर्ण १० १०.५०
१८ महिने पूर्ण ते ३५ महिने १०.५० ११
३६ महिने पूर्ण ११ ११.५०
६० महिने पूर्ण ११.५० १२
deposite-img

विश्‍वास अर्बन

विश्‍वास लाडकी बहीण ठेव योजना

जिच्या घरात असण्याने घराला जसे घरपण येते ती म्हणजे आपली लाडकी बहीण. जग बदलत आहे आणि बदलत्या जगाप्रमाणे तिच्या भविष्यासाठी तिला चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे, तिने तिच्या पायावर उभे राहावे यासाठी लाडक्या बहिणींसाठी विश्‍वास अर्बनची लाडकी बहीण ठेव योजना आहे. या योजनेमध्ये 150,000 रुपये गुंतवा आणि दरमहा मिळवा 1500 रुपये. अधिक माहितीसाठी जवळील विश्‍वास अर्बनच्या शाखेला भेट द्या.

विश्‍वास अर्बन

विश्‍वास शुभमंगल ठेव योजना

मुलगी झाली की वडिलांची काळजी सुरु होते. तिच्या आशा अपेक्षा पूर्ण करून तिचे लग्न सोयीस्कर व्हावे. लग्न असो वा शुभकार्य, घरातील कर्त्या व्यक्तीवर याची एक फार मोठी जबाबदारी असते. ती जबाबदारी कुठल्याही विघ्नाशिवाय पार पडावी यासाठी तो आयुष्यभर जीवाचं रान करत असतो. पण आता या मंगल कार्याची चिंता सोडा, कारण विश्‍वास अर्बन घेऊन आले आहे विश्‍वास शुभमंगल ठेव योजना. या योजनेमध्ये एकरकमी 50,000 रुपये गुंतवा आणि 18 वर्षांनी एकरकमी मिळवा 400,000 रुपये. अधिक माहितीसाठी जवळील विश्‍वास अर्बनच्या शाखेला भेट द्या.

deposite-img

Copyright © 2025 Vishwash Urban , Website Designed by SASH MEDIA